Uddhav Thackeray Saamtv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: 'फोडाफोडीने तुमचा पक्ष संपला; माझी शिवसेना वाढत चालली...' उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Sindhudurg News: उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडी येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत बोलताना ठाकरेंनी शिंदे गटासह भाजप नेते नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी|ता. ४ फेब्रुवारी २०२४

Uddhav Thackeray Sabha:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक, सोलापूर दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडी येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत बोलताना ठाकरेंनी शिंदे गटासह भाजप नेते नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"मला तुम्ही सगळेजण कुटुंबातील सदस्य मानता हे खुप आहे. मन की बात वैगेरे नाही आपली दिल की बात. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला. त्याच लगेच सीसीटीव्ही बाहेर आले ते कोणीही न मागता बाहेर आले, त्याची गरज नव्हती. मी गायकवाड यांची बाजू घ्यायला आलेलो नाही पण त्यांनी काय बोलले ते पाहा. माझे करोडो रुपये त्याच्याकडे आहेत असं गणपत गायकवाड म्हणतायत, पण शिंदे मुख्यमंत्री राहिले तर गुन्हेगारी वाढणार आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपवर टीका...

"मोदीजींना (PM Narendra Modi) एकच सांगायचं आहे आम्ही तुमचे शत्रू नव्हतो. तुम्ही आम्हाला दुर टाकलं पण आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मोदीसाहेब तुमची पिलावळ आहे ती व्यवस्थित काम करत असतील तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसती. तुम्ही मी आजारी असताना हुडी घालून जे जात होता त्याचा परिणाम तुमच्या पक्षांवर झाला. तुमचा पक्ष संपत चाललाय. माझा पक्ष उलट वाढत जातोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदींवर निशाणा...

"अजून निवडणूक बाकी आहे. पण मी तुम्हाला भेटायला आलोय निवडणुकीला देखील येईन, आणि विजयी गुलाल उधळायला पण मी इथेच येईल. मधल्या काळात नौदल दिन साजरा केला मला बर वाटलं की अटलजींच्या जी गोष्ट लक्षात आलं नाही ते यांच्या लक्षात आलं. ते त्यावेळी आले अन् पाणबुडी घेऊन गेले. आता महाराष्ट्रात कायम येतायत पण मला भीती वाटतेय की काहीतरी घेऊन जातील," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT