Maharashtra Politics : ठाकरेंच्या आमदारानं CM शिंदेंशी संपर्क साधला होता; भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट

Bharat gogawale on bhaskar jadhav: राजकारण ढवळून टाकणारा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता, असा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

सचिन कदम, रायगड

Bharat Gogawale vs Bhaskar Jadhav Konkan Politics :

२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने भूकंप होत असतानाच, राजकारण ढवळून टाकणारा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता, असा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला आहे. (Latest Marathi News)

शिवसेना फुटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. यामुळे दोन्ही गटातील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार गोगावले यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
CM Eknath Shinde : 'अत्यंत दुर्दैवी घटना...'; आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर CM शिंदे नेमकं काय म्हणाले?

भास्कर जाधव हे आता आव आणून बोलत आहेत. पण आधी काय करायचं आणि काय नाही? यासाठी भास्कर जाधव हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात होते, असा गोप्यस्फोट गोगावले यांनी केला आहे.

Maharashtra Politics
Who Is Ganpat Gaikwad : रिक्षा चालक ते केबल किंग...! गणपत गायकवाड यांचा आमदार होण्याआधीचा इतिहास

भास्कर जाधव यांनी काल माणगावमधील जाहीर सभेत शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यानंतर भरत गोगावले यांनी भास्कर जाधव यांच्याबाबत मोठा गोप्यस्फोट केला. मतदारसंघातील पूर्वीची पकड कमी झाल्याने भास्कर जाधव हे कासावीस झालेले जीव असल्याची बोचरी टीका देखील गोगावले यांनी यावेळी केली.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : कन्फर्म! लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरली

भरत गोगवले यांनी मोठा गोप्यस्फोट केल्यानंतर रायगडमधील राजकीय नेत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. भरत गोगवले यांच्या गोप्यस्फोटानंतर भास्कर जाधव हे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com