Who Is Ganpat Gaikwad : रिक्षा चालक ते केबल किंग...! गणपत गायकवाड यांचा आमदार होण्याआधीचा इतिहास

Ganpat Gaikwad: लोकांना केबल कनेक्शन फुकटात वाटण्याची राजकारण्याची स्ट्रॅटेजी गायकवाडांनी वापरली. फुकटात केबल कनेक्शन दिल्यानं लोकांनीही मतं दिली. 2009 मध्ये गणपत गायकवाड हे आमदार झाले.
Ganpat Gaikwad History
Ganpat Gaikwad HistorySaam TV
Published On

Who Is Ganpat Gaikwad:

रिक्षा चालक, केबल किंग, अपक्ष आमदार मग भाजप आमदार..! उल्हासनगरच्या गोळीबार घटनेनंतर चर्चेत आलेले गणपत गायकवाड राजकारणात येण्याआधी काय करायचे? रिक्षा चालक ते आमदार होण्यापर्यंतचा त्यांचा इतिहास काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Ganpat Gaikwad History
Ganpat Gaikwad Video: गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाडांचा आणखी एक व्हिडीओ VIRAL

गणपत गायकवाड नेमके कोण?

थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानं आमदार गणपत गायकवाड उर्फ केबल किंग चांगलेच चर्चेत आलेत. एकेकाळी गणपत गायकवाड हे रिक्षा चालवायचे. त्यांनंतर ते केबल व्यवसायात उतरले. लोकांना केबल कनेक्शन फुकटात वाटण्याची राजकारण्याची स्ट्रॅटेजी गायकवाडांनी वापरली. फुकटात केबल कनेक्शन दिल्यानं लोकांनीही मतं दिली. 2009 मध्ये गणपत गायकवाड हे आमदार झाले.

रिक्षा चालक ते भाजपचे आमदार..!

गणपत गायकवाड विधानसभेत कल्याण पूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. गायकवाड हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. गणपत गायकवाड हे 2009 पासून आमदार आहेत.

2009 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा 24 हजार 486 मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते अपक्ष लढले होते. 2014 मध्ये गणपत गायकवाड यांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेना, भाजपची युती तुटली होती. या निवडणुकीत गायकवाड यांनी सेनेच्या उमेदवाराचा 746 मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.

2019 मध्ये गायकवाड भाजपच्या तिकिटावर लढले. त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांचा 12257 मतांनी पराभव केला. गणपत गायकवाड हे उद्योजक म्हणून ओळखले जातात. टीव्ही केबल आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. गणपत यांचा मुलगा वैभव गायकवाड भाजपमध्ये कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदावर आहे. स्थानिकांच्या जमिनी बळकावल्याचा गायकवाड कुटुंबीयांवर आरोप आहे. गायकवाड कुटुंबीयांचा शिंदे गटासोबतचा वादही अनेकदा चर्चेत असतो.

आमदाराने गोळ्या झाडल्या

जमिनीच्या वादावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली. यावेळी आमदार महोदयांना संताप अनावर झाला. त्यांनी महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या. आपल्या लेकाला धक्काबुक्की झाली. म्हणून त्यांनी हे कृत्य केलं. असा कबुली जबाब त्यांनी पोलिसांना दिलाय.

Ganpat Gaikwad History
Amravati Crime: खळबळजनक! कारागृहात सापडला गांजाने भरलेला चेंडू; दोन महिन्यांतील चौथी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com