CM Eknath Shinde : 'अत्यंत दुर्दैवी घटना...'; आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर CM शिंदे नेमकं काय म्हणाले?

CM Eknath Shinde on Ulhasnagar Firing News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam tv
Published On

CM Eknath Shinde on Ulhasnagar Firing Case:

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. सध्या महेश गायकवाड रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच महेश गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. उल्हासनगरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

महेश गायकवाड यांची प्रकृती कशी आहे?

शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर असल्याची डॉक्टरांनी दिली आहे. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या राहुल पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

श्रीकांत शिंदेंकडून महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या. सध्या त्यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com