Ramdas Athawale: छगन भुजबळ भाजपपेक्षा आरपीआयमध्ये आले तर त्यांचे स्वागतच : रामदास आठवले

Maharashtra Politics: संधी मिळाली तर शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. लोकसभेत संधी मिळाली तर पुन्हा मंत्रीपद नक्की मिळेल, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaamtv
Published On

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. ४ फेब्रुवारी २०२४

Ahmednagar News:

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा दावा केला होता. भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा समोर आल्यानंतर आता आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी त्यांना थेट पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

"छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ओबीसी प्रश्नासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. ओबीसींच्या प्रश्नांवरूनच त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे. मात्र ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे. भाजप पेक्षा ते आरपिआय मध्ये आले तर स्वागतचं, "असे रामदास आठवले (Ramdas Athvale) यावेळी म्हणाले.

शिर्डी लोकसभा लढण्यास इच्छुक...

"मी लोकसभेचा माणूस. संधी मिळाली तर शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. लोकसभेत संधी मिळाली तर पुन्हा मंत्रीपद नक्की मिळेल. 2009 साली शिर्डीत काही गैरसमजातून माझा पराभव झाला.मात्र आता मी केंद्रात मंत्री आहे. पुन्हा शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी अनेक लोक आग्रही आहेत," असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Vidarbha Politics : विदर्भात 10 लोकसभा जागांसाठी भाजपाची जोरदार तयारी; महायुतीत कोणाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष

पक्ष फोडल्याचा आरोप चुकीचा...

"अलीकडे अत्यंत गलिच्छ राजकारण बघायला मिळत आहे. पक्षाचे नेते आमदार सांभाळू शकले नाही म्हणून ते फुटले. उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपला पाठिंबा दिला असता तर चाळीस आमदार फुटले नसते. देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी मोदींच्या सोबत यायला हवे होते. त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांचाही पक्ष फुटला नसता. आम्ही त्यांना फोडले नाही तर आमदार आमच्याकडे आले असे म्हणत पक्ष फोडल्याचा आरोप चुकीचा आहे.." असे रामदास आठवले म्हणाले. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Nagpur Crime News: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून केली हत्या, नागपूरमध्ये दोन दिवसांत तीन खूनाच्या घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com