नागपूरमध्ये (Nagpur) नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. नुकताच नागपूरमध्ये नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्विकारला आहे. त्यानंतर दोनच दिवसात तीन खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण देखील निर्माण झालंय. या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये (Kapilnagar Police Station Area) घडली आहे. अगदी क्षुल्लक कारणातून ही भयंकर घटना घडली आहे. मंगेश मेंढे असं मृतकाचं नाव तर राहुल रामटेके असं आरोपीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नक्की काय घडलंय
आरोपी राहुल रामटेके आणि मृतक मंगेश मेंढे एकमेकांना चांगले ओळखत होते. आरोपीने मृतक मंगेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. राहुल हा व्यसनाधीन असल्यामुळे मंगेशने त्याला पैसे दिले नाही, त्याला हाकलून लावलं. याचा आरोपीला प्रचंड राग आला. काही वेळानंतर आरोपी राहुल हा मृतक मंगेशच्या जवळ आला. त्याने रागाच्या भरात मंगेशच्या पोटात चाकूने दोन-तीन वार (Youth Killed In Nagpur) केले.
चाकूहल्ल्यात मंगेश मेंढे जखमी
या चाकूहल्ल्यात मंगेश मेंढे हा खूप जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला होता. घटनेनंतर लगेचच मंगेशला मेयो हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मंगेशला तपासले आणि मृत घोषित (Crime News) केलं. ही घटना टेका नाका शिवारात रात्री दहाच्या सुमारास घडली.
आरोपीला अटक केली
मृतक मंगेश मेंढे हा ट्रेडिंग व्यवसाय करत होता, तर आरोपी राहुल रामटेके हा मजुरीचं काम करत होता. हे दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. यात राहुलला दारूचं व्यसन (Nagpur Crime) होतं. क्षुल्लक कारणातून खून झाला आहे. आता कपिलनगर पोलीसांनी आरोपी राहुल रामटेकेला अटक केली आहे.
पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेमुळं परिसरात दहशतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त (new police commissioner) म्हणून डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर दोन दिवसांत तीन खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.