Bhujbal Resignations: छगन भुजबळ यांच्या गौप्यस्फोटानंतर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या राजीनामा दिल्याच्या विधानावर अजित पवार गटाने आपली प्रतिक्रिया दिलीय. त्याचबरोबर इतर राजकीय नेत्यांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. राजीनामा दिला की नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam Tv
Published On

Ajit Pawar Group Reaction Chhagan Bhujbal Resignations Secret:

आज अहमदनगरमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्याच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट केला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आपण आधीच राजीनामा दिल्याचं म्हटलं. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भुजबळ यांनी केलेल्या राजीनाम्याच्या विधानाला त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चांशी संबंध जोडला जात आहे. (Latest News)

छगन भुजबळ यांच्या राजीनामा दिल्याच्या विधानावर अजित पवार गटाने आपली प्रतिक्रिया दिलीय. त्याचबरोबर इतर राजकीय नेत्यांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. राजीनामा दिला की नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या महा एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी राजीमान्याचा गौप्यस्फोट केला. आपण १६ नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट भुजबळांनी यावेळी केला. सरकारमधील लोक विरोधी पक्षाचे नेते राजीनामा द्या सांगतात, तसे सरकारमधील लोकही मागतात. मला त्या सगळ्यांना सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला पहिली रॅली झाली. १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला मग रॅलीला गेलो, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला

यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ साहेब काय बोलले, त्यांच्या काय भावना आहेत या निश्चितपणे आम्ही जाणून घेऊ आणि मगच त्यावर प्रतिक्रिया देऊ. अहमदनगरचे भाषण मी ऐकले नाही. मी त्यांच्याशी जरूर बोलेल, समजून घेईल आणि त्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया देईल असं तटकरे म्हणालेत.

भाजपच्या वाटेवर भुजबळ

भुजबळ साहेब कधीही पक्ष सोडणार नाहीत. भुजबळ साहेब आज जे काही बोलले त्याबाबत मी आज रात्रीच्या उद्या सकाळी त्यांच्याशी बोलले आणि प्रतिक्रिया देईन. छगन भुजबळ यांची वारंवार माझ्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची ही चर्चा झाली. भुजबळ साहेब नाराज कुठेही नाही मात्र आपल्या भावना त्या स्पष्टपणे मांडत आहेत. दरम्यान मंत्री छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी केला होता. त्यानंतर भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? स्वत:च केला दमानीयांच्या वक्तव्याचा खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com