Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीदरम्यान शिंदेंची खेळी, उद्धव ठाकरेंचा दिग्गज नेता फोडला

Amravati Politics: विधानपरिषद निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी केली. अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला.

Priya More
  • अमरावतीतील मोठी राजकीय घडामोड

  • ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा

  • नरेंद्र पडोळे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश

  • बच्चू कडू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी निर्णय घेतला

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. विधान परिषद निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिंदेनी ठाकरेसेनेचा बडा नेता फोडला. जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी आज सर्वपदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. ते आजच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी होऊन शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिला. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात नरेंद्र पडोळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या अमरावतीत सुरू आहे.

जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नरेंद्र पडोळे यांच्याकडे अचलपूर, मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. ते गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेसेनेसोबत काम करत होते. अमरावती जिल्ह्यातील एक सक्रीय राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत आणि जन आंदोलनामध्ये ते अत्यंत सक्रीय होते. ठाकरेसेनेत असताना त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची बरीच चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death : जादुई आवाज हरपला! ज्येष्ठ गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस कोर्टात हजर; अभिनेत्रीने सर्व आरोप फेटाळले

Rajinikanth First Salary : रजनीकांत यांचा पहिला पगार किती? बस कंडक्टर असतानाच ID कार्ड समोर

Khanderi Fort : अलिबागच्या समुद्रात दडलेले मराठा वैभव, खांदेरी किल्ल्याला 'खांदेरी' नाव कसं पडलं?

SCROLL FOR NEXT