तोंड धुतल्यानंतर फक्त २ मिनिटे करा हे काम; मेकअपशिवायही चेहरा दिसेल ग्लोइंग

Manasvi Choudhary

चेहऱ्याची घ्या काळजी

चेहरा धुतल्यानंतर योग्य प्रकारे काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्यापैकी अनेकजण चेहरा धुतल्यानंतर तो कोरडा करता मात्र तुम्हाला माहितीये का?

Glowing Skin Tips

चेहरा धुतल्यानंतर फॉलो करा सोप्या टिप्स

चेहरा धुतल्यानंतर केवळ तो पुसणे म्हणजेच कोरडा करणे महत्वाचे नाही तर तुम्ही चेहरा धुतल्यानंतर पहिले काही मिनिटे त्वचेची काळजी घेतली पाहिजे.

Face Wash

त्वचा मऊ आणि निरोगी राहते

त्वचेला योग्य आवश्यक पोषण देणे महत्वाचे आहे. यामुळे त्वचा दिर्घकाळ मऊ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

Natural Skin Glow Tips

चेहऱ्यावरील घाण होते कमी

फेस वॉश चेहऱ्यावरील घाण, घाम आणि अतिरिक्त तेल काढून टाकते मात्र यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Glowing Skin Tips

चेहरा टॉवेलने घासू नका

यासाठी चेहरा धुतल्यानंतर निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी चेहऱ्यावर टॉवेलने जोरात घासू नका यामुळे जळजळ आणि कोरडेपणा वाढू शकतो.

Glowing Skin Tips

चेहरा हलक्या हाताने टॅप करा

चेहऱ्यावरची त्वचा संवेदनशील असते यासाठी चेहऱ्याच्या काळजीसाठी हलक्या हाताने टॅप करा जेणेकरून पाणी शोषले जाईल.

Glowing Skin Tips

टोनर लावा

चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर हायड्रेटिंग टोनर लावा यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

Glowing Skin Tips

सीरम लावा

चेहरा धुतल्यानंतर सीरम लावणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण सीरममधील सक्रिय घटक त्वचेमध्ये आतून काम करतात यामुळे तुम्ही योग्य सीरम निवडणे महत्वाचे आहे.

Glowing Skin Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: किडनी अन् लिव्हर आयुष्यभर राहतील हेल्दी, फक्त या सवयी लगेच बदला

येथे क्लिक करा...