किडनी अन् लिव्हर आयुष्यभर राहतील हेल्दी, फक्त या सवयी लगेच बदला

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे कारण याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होत आहे.

Healthy Kidney And Liver Tips

मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य

मूत्रपिंड आणि यकृत हे शरीराचे दोन महत्वाचे अवयव आहेत. मूत्रपिंड रक्त गाळून शरीरातील विषारी द्र्व्ये आणि अतिरिक्त पाणी काढून टाकचे.

तर अन्नाचे उर्जेत रूपांतर करणे, शरीरात पोषक तत्वांचा साठा करणे ही कार्य यकृत करते.

Healthy Kidney And Liver Tips

आरोग्याच्या समस्या

आरोग्यतज्ज्ञांनुसार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, मद्यपान आणि धूम्रपान यासवयींमुळे मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या निर्माण होतात.

Healthy Kidney And Liver Tips | google

सुरूवातीला दिसणारी लक्षणे

आरोग्यतज्ज्ञानुसार, मू्त्रपिंड आणि यकृत या आजारांची लक्षणे शरीरात सुरूवातीला दिसतात. वेळेवर जीवनशैलीत बदल केल्यास हे दोन्ही अवयव निरोगी राहण्यास मदत होते.

Healthy Kidney And Liver Tips | pinterest

असा करा जीवनशैलीत बदल

संतुलित आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी पिणे, रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.

drink water | pinterest

मुख्य लक्षणे

तुम्हाला जर सतत थकवा, पायांना सूज, लघवीच्या रंगात बदल, वारंवार कावीळ होणे ही आजाराची मुख्य लक्षणे आहेत याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Healthy Kidney And Liver Tips

मद्यपान करणे टाळा

अतिमद्यपानामुळे यकृतामध्ये चरबी साठण्याचा, हिपॅटायटीस आणि सिरोसिसचा धोका वाढतो वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे.

Healthy Kidney And Liver Tips | pinterest

जास्त मीठ खाणे टाळा

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडावरील ताण वाढतो. अतिरिक्त साखर आणि गोड पेयांमुळे लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.

Healthy Kidney And Liver Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: पावसाळ्यात ओल्या कपड्यांमुळे वाढतो त्वचा आणि फंगल इन्फेक्शनचा धोका, कशी घ्याल काळजी

Monsoon Health Care Tips
येथे क्लिक करा...