पावसाळ्यात ओल्या कपड्यांमुळे वाढतो त्वचा आणि फंगल इन्फेक्शनचा धोका, कशी घ्याल काळजी

Manasvi Choudhary

आरोग्याची घ्या काळजी

पावसाळ्यात दमट वातावरणामुळे कपडे लवकर सुकत नाही. तसेच पावसात भिजल्यामुळे देखील कपडे ओले होतात. अशावेळी तुम्ही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Monsoon Health Care Tips

फंगल इन्फेक्शनचा वाढतो धोका

ओल्या कपड्यांमुळे त्वचेवर ओलावा राहतो. हा ओलावा बुरशी वाढवतो यामुळे मानेभोवती, काखेत आणि पाठीवर खाज सुटणे, आणि गोल चट्टे उठणे यासांरख्या समस्या उद्भवतात.

Monsoon Health Care Tips

त्वचेच्या समस्या वाढतात

दमट कपडे त्वचेला सतत घासले जातात आणि त्वचेला हवा मिळत नाही. यामुळे त्वचेवर लालसर पुरळ उठतात, तीव्र खाज सुटते आणि जळजळ होऊ शकते.

Monsoon

सर्दी - खोकल्याचा त्रास

पावसाळ्यात ओले कपडे घातल्याने बराच वेळ घातल्याने शरीराचे तापमान कमी होते ज्यामुळे सर्दी , ताप,खोकला त्रास होऊ शकतो.

Cold and cough | yandex

संसर्ग आजारांचा वाढतो

पावसात भिजल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरावरील ओलसरपणामुळे संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो.

Monsoon Health Care Tips | Saam Tv

शरीराला दुर्गंधी येते

कपडे पूर्ण सुखलेले नसतील तर त्यातबॅक्टेरिया आणि जंतू वेगाने वाढतात. हे कपडे अंगावर घातल्यामुळे घामासोबत मिळून शरीराला दुर्गंधी सुटते आणि त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्स किंवा फोड येऊ शकतात

Monsoon Health Care Tips | pinterest

कपड्यातील ओलावा

पावसाळ्यात कपडे वाळवणे कठीण जाते, अशा वेळी कपडे इस्त्री करून घाला. इस्त्रीच्या उष्णतेमुळे कपड्यातील राहिलेला ओलावा आणि जंतू नष्ट होतात.

Monsoon Health Care Tips | Saam Tv

घट्ट किंवा नायलॉनचे कपडे घालू नका

या ऋतूत घट्ट किंवा नायलॉनचे कपडे घालणे टाळा. शक्यतो सैल आणि सुती कपडे वापरा, जेणेकरून त्वचेला हवा मिळेल.

Clothes Drying Tips

फॅन खाली कपडे सुकवा

घरात कपडे वाळत घालताना फॅन सुरू ठेवा. कपडे सुकत घालताना पंख्याखाली घाला यामुळे कपडे लवकर सुकतील.

Clothes Drying Tips

NEXT: पावसाळ्यात प्या मस्त गरमा गरम मिक्स व्हेजिटेबल सूप, चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर

पावसाळ्यात प्या मस्त गरमा गरम मिक्स व्हेजिटेबल सूप, चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर
येथे क्लिक करा..