Manasvi Choudhary
पावसाळ्यात गरमा गरम सूप पिण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. सूप आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो.
सूप तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे.
सूप बनवण्यासाठी गाजर, सिमला मिरची, वटाणा, टोमॅटो, कांदा, लसूण, अमूल बजर, बीट, कोबी, कॉर्नफ्लोअर, साखर, जिरा पावडर हे साहित्य घ्या.
सर्वातआधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. गॅसवर कढईमध्ये बटर टाका नंतर त्यात लसूण, कांदा चांगला परतून घ्या.
मिश्रण चांगले मिक्स झाले की त्यात बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करा. भाज्या मिक्स झाल्या की पाणी टाका.
भाज्या शिजल्या की थोड्याशा भाज्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा. गॅसवर कढईमध्ये भाज्यांची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ चांगले उकळून घ्या.
अशाप्रकारे घरच्या घरी गरमा गरम सूप तयार होईल.