Surabhi Jayashree Jagdish
स्कॅमर्स अनेकदा फोन कॉल, एसएमएस, ई-मेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधतात. ते स्वतःला बँक, सरकारी संस्था किंवा एखाद्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवतात.
इंटरनेटवर प्रत्येक डिव्हाइसचा एक IP अॅड्रेस असतो. ज्याच्या आधारे अंदाजे भौगोलिक स्थानाची माहिती मिळू शकते. काही IP ट्रॅकिंग वेबसाइट्स युजर्सने लिंक उघडल्यास संबंधित IP नोंदवतात.
काही IP ट्रॅकिंग एखाद्या वेबसाइटची शॉर्ट लिंक तयार करण्याची सुविधा देतात. ही लिंक तयार करताना उपलब्ध असल्यास ट्रॅकिंगचे पर्याय निवडता येतात. त्यानंतर तयार झालेली लिंक कॉपी करून वापरता येते.
समोरील व्यक्तीने ट्रॅकिंग लिंक उघडल्यास काही सेवांमध्ये IP अॅड्रेस, वापरलेला ब्राउझर, ऑपरेटिंग सिस्टम आणि अंदाजे लोकेशनची माहिती दिसू शकते. काही प्रकरणांमध्ये डिव्हाइसचा प्रकार किंवा इंटरनेट सेवेची माहितीही मिळू शकते.
काही ट्रॅकिंग सेवांमध्ये GPS लोकेशनचा पर्याय असतो. मात्र युजर्सने आपल्या डिव्हाइसवर लोकेशन परवानगी दिली तरच GPS आधारित माहिती मिळू शकते. परवानगी न दिल्यास केवळ IP आधारित अंदाजे लोकेशनच उपलब्ध होते.
ट्रॅकिंगमधून मिळालेली माहिती स्कॅमरबाबत प्राथमिक पुरावा म्हणून उपयोगी ठरू शकते. या माहितीच्या आधारे स्वतः आरोपीला शोधण्याचा किंवा त्याच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करू नये.
स्कॅमरची कोणतीही माहिती मिळाल्यास ती त्वरित सायबर क्राइम पोर्टल किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. भारतात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल किंवा हेल्पलाइन 1930 वर करता येते.