Ratnagiri Tourism : खडतर चढाई पण निसर्गाचे अद्भुत नजारे, रत्नागिरीतील 'हा' ट्रेकिंग स्पॉट एकदा पाहाच

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात तुम्हाला मित्रांसोबत ट्रिप प्लान करायची असेल तर 'लिंगाचा डोंगर' हे बेस्ट लोकेशन आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते.

rainy season | pinterest

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर आणि आंगवली परिसरातील सह्याद्री रांगेत 'लिंगाचा डोंगर' हे ठिकाण वसलेले आहे. यात ७० अंशांचा तीव्र चढ, दाट जंगलातील वाटा आणि आसपासच्या धबधब्यांची विहंगम दृश्ये यांचा समावेश आहे.

Ratnagiri | google

ट्रेकिंगचा थरार

'लिंगाचा डोंगर' चा ट्रेकिंग आंगवली गावापासून सुरु होते. कोकणात गेल्यावर या ठिकाणी एक वन डे ट्रिप प्लान कराच. लिंगाच्या डोंगराच्या अंतिम टप्प्यावर ७० अंशांचा तीव्र चढ असून तो एका लहान गुहेपर्यंत (शिखरावरील गुहा) जातो.

trekking | pinterest

पर्यटन स्थळे

लिंगाचा डोंगर ट्रेकच्या आसपासच्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये नैसर्गिक शिवालिंगाच्या आकाराचा खडक, मार्लेश्वर मंदिर आणि मार्लेश्वर धबधबा यांचा समावेश होतो.

tourist spots | google

शिवलिंग शिखर

शिखरावर नैसर्गिक खडकापासून बनलेली शिवलिंगासारखी रचना आहे. हिरव्यागार दऱ्या आणि डोंगररांगांचे ३६०-अंशांचे विहंगम दृश्य येथे पाहायला मिळते.

Shivaling peak | google

मार्लेश्वर मंदिर

मार्लेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे प्रसिद्ध प्राचीन गुहा मंदिर आहे. मंदिराच्या जवळ वेगाने खाली पडणारा मार्लेश्वर धबधबा आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

Marleshwar Temple | google

निसर्ग सौंदर्य

लिंगाचा डोंगरला गेल्यावर तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. जंगलातील वाटा, मोकळी गवताळ मैदाने आणि डोंगररांगांवरील खडकाळ भागांमधून फिरताना खूपच मजा येईल.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : डोंबिवलीजवळ फिरण्यासाठी 'ही' आहेत ५ सुंदर पर्यटन स्थळे, वीकेंडला पावसात येईल मजा

Dombivli Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...