Dombivli Tourism : डोंबिवलीजवळ फिरण्यासाठी 'ही' आहेत ५ सुंदर पर्यटन स्थळे, वीकेंडला पावसात येईल मजा

Shreya Maskar

पावसाळी ट्रिप

येणाऱ्या वीकेंडला डोंबिवलीला पिकनिक प्लान करा. पावसाळ्यात येथे तुफान मजा-मस्ती करता येईल. सुंदर ठिकाणांची नावे नोट करा.

Rainy trip | google

दुर्गाडी किल्ला

डोंबिवलीजवळ कल्याण येथे दुर्गाडी किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात बांधलेला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. येथून उल्हास नदीचे सुंदर दृश्य दिसते.

Durgadi Fort | google

महादेव हिल

डोंबिवली पूर्व येथे महादेव हिल आहे. टेकडीवर छोटीशी भटकंती आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी एक शांत स्थानिक ठिकाण. हे ठाकुर्लीजवळील कचोरे गावात स्थित आहे.

Mahadev Hill | google

देसाई खाडी

मुंब्रा येथे देसाई खाडी आहे. संध्याकाळच्या शांत फेरफटक्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी लोकप्रिय असलेला निसर्गरम्य खाडीचा परिसर आहे.

trip | google

गणपती गडद लेणी

कल्याण येथे गणपती गडद लेणी आहे. घनदाट जंगलात वसलेली प्राचीन आणि नैसर्गिकरीत्या खडकात कोरलेली लेणी येथे पाहायला मिळतात.

Ganapati Caves | google

मलंगगड

कल्याण येथे मलंगगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. आव्हानात्मक ट्रेकिंग आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे सुंदर आहे. हे ठिकाण डोंबिवलीपासून २५ किमी अंतरावर आहे.

Malanggad | google

बारवी धरण

बदलापूर येथे बारवी धरण वसलेले आहे. डोंगर आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेले एक विशाल आणि निसर्गरम्य धरण. हे ठिकाण डोंबिवलीपासून ४० किमी अंतरावर आहे.

Barvi Dam | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्राचं 'चेरापुंजी' कधी पाहिलंय का? पावसाळ्यात स्वर्गापेक्षा कमी नाही

Sawantwadi Hill Station | AI PHOTO
येथे क्लिक करा...