Shreya Maskar
सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक निसर्गरम्य शहर आहे. सावंतवाडीजवळ आंबोली हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.
आंबोलीमध्ये अतिवृष्टी होते आणि हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर वसलेले आहे.पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये आंबोली हिल स्टेशन आहे.
पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे या ठिकाणाला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हटले जाते. हे ठिकाण येथील धबधबे, धुक्याने वेढलेल्या दऱ्या आणि समृद्ध जैवविविधतेसाठी विशेष ओळखले जाते.
आंबोली धबधबा पाहायला परदेशी पर्यटकही गर्दी करतात. तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. तसेच पावसाच्या पाण्यात चिंब भिजायला येथे नक्की जा.
कवळेसाद पॉईंट हे ठिकाण येथील 'उलटा धबधबा' (रिव्हर्स वॉटरफॉल) साठी प्रसिद्ध आहे, जिथे जोरदार वाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह आकाशाच्या दिशेने वर ढकलला जातो.
येथे पाणी मोठ्या गर्जनेसह एका खोल आणि अरुंद दरीत कोसळते, जे एक विलोभनीय दृश्य असते. हिरण्यकेशी मंदिर - हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी असलेले हे एक प्राचीन मंदिर आहे, जे दाट आणि शेवाळयुक्त जंगलांनी वेढलेले आहे.
आंबोलीजवळ महादेवगड व्ह्यू-पॉईंट, सनसेट पॉईंट आहेत. या ठिकाणाला तुम्ही संध्याकाळी आवर्जून भेट द्या. तसेच येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.