Shreya Maskar
मुंबईच्या गर्दीत एक शांत, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण लपलेले आहे. ते म्हणजे बाणगंगा तलाव होय.
बाणगंगा तलाव हा दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील वाळकेश्वर मंदिर परिसरातील १२ व्या शतकातील एक पवित्र पायऱ्यांचा जलाशय आहे.
बाणगंगा तलावाला 'मुंबईची छोटी काशी'किंवा 'मिनी बनारस' म्हणूनही ओळखले जाते. या तलावाला भूगर्भातील गोड्या पाण्याच्या झऱ्यातून पाणी मिळते.
बाणगंगा तलावाजवळ ग्रँट रोड रेल्वे स्टेशन आहे. ग्रँट रोड रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सीने बाणगंगा तलावाजवळ पोहचाल.
बाणगंगा तलावाचा हिंदू महाकाव्य 'रामायण'शी पौराणिक संबंध असल्याचे बोले जाते. लोक येथे पवित्र स्नान करण्यासाठी, पूर्वजांचे विधी करण्यासाठी येतात.
बाणगंगा तलावाजवळ वाळकेश्वर मंदिर आहे, ज्याला 'बाणगंगा मंदिर' म्हणूनही ओळखले जाते. हे मलबार हिलमध्ये अगदी पाण्याच्या काठावर स्थित आहे.
बाणगंगा तलाव हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. शिलाहार राजवटीने ११२७ ईसवी सनात याची निर्मिती केली. हा आयताकृती तलाव असून त्याच्या चारही बाजूंना पायऱ्या आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.