Panvel Waterfall : शहराच्या गोंगाटापासून दूर लपलाय 'हा' धबधबा, विकेंडला करा अविस्मरणीय निसर्ग सफर

Shreya Maskar

पनवेल

नवी मुंबई येथील पनवेल रेल्वे स्थानकापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर अडाई गावात सुंदर अडाई धबधबा वसलेला आहे. वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Panvel | google

अडाई धबधबा

अडाई धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी १० -१५ मिनिटांचा ट्रेक करावा लागतो. मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Adai Falls | google

हिरवागार निसर्ग

येथे हिरवागार निसर्ग, धबधब्याच्या पायथ्याशी असलेला उथळ नैसर्गिक जलाशय आणि आसपासच्या भागात ४-५ लहान लपलेले धबधबे पाहायला मिळतात.

Green nature | google

फोटोशूट

पावसाळ्यात धबधब्या खाली चिंब भिजायचे असेल तर हे सुरक्षित ठिकाण आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद देखील घेऊ शकता.

photoshoot | google

पावसाळा

पावसाळ्यात येथे तुम्हाला धुक्याची चादर, इंद्रधनुष्य पाहायला मिळेल. कमी पैशांत येथे तुफान मजा-मस्ती करता येईल. धबधब्याच्या जवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत.

rainy season | google

कर्नाळा पक्षी अभयारण्य

अडाई धबधब्याजवळ प्रसिद्ध कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. येथे तुम्हाला दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. लहान मुलांना येथे खूप मजा येईल.

Karnala Bird Sanctuary | google

पांडवकडा धबधबा

तसेच अडाई धबधब्याजवळ पांडवकडा धबधबा देखील आहे. पांडवकडा धबधबा हा पर्वतांनी वेढलेला असून खूप उंच धबधबा आहे.

Pandavkada Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : लोणावळ्याजवळील ३०० वर्षे जुना किल्ला, 'हे' ठिकाण इतिहासप्रेमींनी एकदा तरी पाहाच

Pune Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...