Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: डोंबिवलीत ठाकरे गटाची मतदारांना भावनिक साद, शहरातील बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा

Uddhav Thackeray Group Banner: आगामी निवडणूकांच्या पार्शभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येकजण आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डोंबिवलीमध्ये देखील बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक आवाहन करण्यात आलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uddhav Thackeray Group Banner In Dombivli

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. आपापल्या पक्षाचा प्रचार सर्वच राजकीय पक्ष करत (Maharashtra Politics) आहे. शिंदे गट आणि अजित पवार तसंच उद्धव ठाकरे गटदेखील आपली ताकद दाखवून देण्यासाठी धडपडत आहे. मतदार राजा, हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये. तुझं एक मत 'हुकूमशाही' उलथविण्यासाठी' अशा आशयाचे बॅनर उद्धव ठाकरे गटाकडून डोंबिवलीत लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने नागरिकांना मतदारांना भावनिक आवाहन केल्याचं दिसून येतंय. (Latest Marathi News)

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडून (shiv sena) लावण्यात आलेले हे बॅनर आता डोंबिवली चर्चेचा विषय ठरले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray Group Banner

ठाकरे गट लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज

'मतदार राजा हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये, तुझं एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी' अशा आशयाचे बॅनर (Uddhav Thackeray Group Banner) डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबिवली शहर शाखेच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसली असल्याची चर्चा सुरु आहे.

या बॅनरबाजीने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे बॅनर (Uddhav Thackeray Group) लावण्यात आले आहेत, असं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT