Maharashtra Politics : कन्फर्म! महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड; 'वंचित'ची अखेर महाविकास आघाडीत एन्ट्री

Vanchit Bahujan Aghadi : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा अखेर महाविकास आघाडीत समावेश झालाय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिलीय.
Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra Politics
Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra PoliticsSocial Media
Published On

(गिरीश कांबळे, मुंबई)

Vanchit Bahujan Aghadi in Mahavikas Aghadi :

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. आजच्या बैठकीला मविआ नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलं होते. आज झालेल्या बैठकीत 'वंचित'चा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलाय. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याविषयी माहिती दिलीय. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना यासंबंधी पत्र पाठवण्यात आले आहे. (Latest News)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरात तयारी सुरू केलीय. भाजपाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेतले जात आहे. अनेक गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे,असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं म्हणत होते. परंतु महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते. परंतु, आज (३० जानेवारी) वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर केली आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एक्सवर पोस्ट करत आघाडीची माहिती दिली.

ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत सहभागी होतील. वंचितमुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता महाविकास आघाडीकडून आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं. त्यानुसार वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचं अधिकृत पत्र द्यावं, अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानुसार ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं.

Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra Politics
Sanjay Raut : 'लाज वाटली पाहीजे...'; महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईवरुन संजय राऊतांची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com