saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकारणात मोठी घडामोड; बार्शीनंतर आणखी एका ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र,भाजपचं वाढलं टेन्शन

Maharashtra Politics Shinde Group- Thackeray Group Yuti: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. बार्शीनंतर माढ्यात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले आहेत.

Bharat Jadhav

  • बार्शीनंतर माढ्यात दोन्ही शिवसेना एकत्र

  • जिल्हा परिषद निवडणुकांआधी राजकीय समीकरणं बदलली

  • भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं

महापालिका निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट राहिला. दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं भाजपसोबत युती केली होती. महापालिकेनंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून यावेळी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. सोलापूर जिल्हातल्या बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय. इतकेच नाही येथे भाजपसाठी मोठं आव्हान उभं राहिलंय.

माढ्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे. भाजपच्या पॅनलविरोधात हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार करण्यात आलंय. येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष एक झालेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट देखील एकत्र आलेत.

दरम्यान नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं राबवलेल्या बिनविरोध पॅटर्न झेडपीमध्येही दिसत आहे. कोकणात भापजने बिनविरोधचा धडाका लावलाय. तेथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत १० जणांचा बिनविरोध विजय झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT