Ajit Pawar Uddhav Thackeray Saamtv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: सर्वात मोठा राजकीय भूकंप अन् ठाकरेंची २ शब्दात सडेतोड प्रतिक्रिया; म्हणाले...

Uddhav Thackeray On Ajit Pawar NCP: सर्वात मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दात स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Political Latest News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. 40 आमदारांना घेऊन अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

राज्याच्या राजकारणातला हा सर्वात मोठा भूकंप आहे. या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दात स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या चांगलीच होत आहे. (Ajit Pawar NCP News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारला दोनच दिवसांपुर्वी वर्षपुर्ती झाली. मोठ्या राजकीय नाट्यानंतर हे सरकार सत्तेत आले होते. आता त्यानंतर एका वर्षांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळत मोठी घडामोड झाली असून राज्यात नवे मंत्रिमंडळ आले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे...

राज्यात एवढा मोठा राजकीय भूकंप होत असताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) पुण्यातील कोयता हल्ल्यातील तरुणीला वाचवणाऱ्या जिगरबाजांचे कौतुक करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. तसेच या संपूर्ण राजकीय घडामोडीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी नांदा सौख्य भरे.. अशी दोन शब्दांची खोचक टीका केली आहे. (Maharashtra Political News)

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारला विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी साथ दिली आहे. अजित पवार यांनी विकासाचे राजकारण केले असून काम करणाऱ्या नेत्याला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जाते तेव्हा अशा घटना घडतात;" असे म्हणत महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले आहेत.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT