Mahesh Tapase News: अजित पवार भाजपसोबत गेले तरी फिकीर नाही; महेश तपासेंनी थोपटले दंड

अजित पवार भाजपसोबत गेले तरी फिकीर नाही; महेश तपासेंनी थोपटले दंड
Satara Mahesh Tapase
Satara Mahesh TapaseSaam tv
Published On

सातारा : महाराष्ट्रातला सामान्य समाज शरद पवारांसोबत आहे. आज पार पडलेल्या राजभवनातील (Sharad Pawar) शपथविधीला शरद पवारांसह (NCP) राष्ट्रवादीचा कोणाताही पाठींबा नाही. पुढील काळात पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा राष्ट्रवादी बांधू; असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे. (Tajya Batmya)

Satara Mahesh Tapase
Samruddhi Mahamarg Accident: झोप उद्या खुप काम करायचं; अपघातापूर्वी मोठ्या बहिणीचे तनिषाशी बोलणे ठरले अखेरचे

सातारा येथे प्रवक्‍ते महेश तपासे यांनी प्रतिक्रीया देताना साताऱ्यात भाजप आणि अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहे. अजित पवार यांनी भाजप– शिवसेनेला पाठींबा दर्शविला. त्‍यांच्‍यासोबत काही आमदार देखील गेले आहेत. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्‍यमंत्री पदाची शपथ घेतली. याबाबत तपासे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवारांची कोणत्याही प्रकारची घुसमट राष्ट्रवादीत होत नव्हती. मात्र अजित पवार जाणं हा ऑपरेशन लोटसचा भाग असल्‍याचे ते म्‍हणाले.

Satara Mahesh Tapase
Solapur News: अजित पवारांची शपथ; सोलापूरात राष्‍ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

भाजप कोणाचा मित्र होवु शकत नाही

अजित पवारांवर यंत्रणांचा मोठा दबाव होता का, हे माहीत नाही. मात्र भाजपा (BJP) सातत्याने यंत्रणांचा (Satara) गैरवापर करते हे नक्की आहे. भाजप कधीच कोणाचं मित्र होवु शकत नाही. भाजपाचे चाललेले राजकारणं हे किती दिवस चालतं हे काळच ठरवेल असं महेश तपासे म्हणाले. राष्ट्रवादी कधीच संपु शकत नाही असा विश्वास सुद्धा महेश तपासेंनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com