चेतन व्यास
वर्धा : ‘ताई गाडी खूप हलतेय ग, झोपच नाही येत आहे. असा संदेश तनिषाने आपल्या बहिणाला मोबाईलवर पाठविला. खासगी बसमधील तनिषाचा पहिलाच प्रवास असल्याने ही भीती (Wardha) सहाजीकच आहे. म्हणून बहिणीनेही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिला समजवून सांगत ‘उद्या खूप काम आहे, तुला आराम करायला वेळ मिळणार नाही. म्हणून आता मोबाईल डाटा बंद कर आणि निवांत झोप’ असा मोलाचा सल्ला बहिणीने (Samruddhi Highway Accident) तनिषाला दिला. मात्र, काळ टपून बसला होताच. मध्यरात्री खासगी ट्रव्हल्सला अपघात झाला आणि तनिषा कायमचीच झोपी गेली. (Live Marathi News)
समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून यात वर्ध्यातील एक- दोन नाही तर तब्बल १४ व्यक्तींचा समावेश आहे. मृतकांमध्ये एक तनिषा तायडे हीचाही होरपळून मृत्यू झाल्याने परिवाराचे अवसान गळाले. तिची बहिण मेघना ही पुण्यात आयटी इंडस्ट्रीमध्ये नोकरीवर असून ती तनिषा येण्याची वाट बघत होती. तनिषाला बहिणीने बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी तीला पुण्यात बोलावले.
तो संदेशही अखेरचा
तनिषा शिक्षणाकरिता पुण्यात येणार. उद्यापासून (Samruddhi Mahamarg) तिचा दिनक्रम सुरु होणार म्हणून ती तनिषा गाडीमध्ये बसल्यापासून सतत संपर्कात होती. त्या दोघींनीही पावणे बारा वाजतापर्यंत चॅटींग केलं. खासगी बसचा पहिला प्रवास असल्याने घाबरलेल्या धाकट्या बहिणीला धीर देण्याचे काम थोरल्या मेघनाने केले. तिच्या सांगण्यावरुनच तनिषा झोपी गेली..ती कायमचीच. आता तोच संदेश पाहून (Accident) मेघनाही पूर्णत: ढासळली. मोठ्या हिंमतीने आणि मोबाईलवरील त्या अखेरच्या संदेशासोबतच सिंदखेडराजा येथे आज सामूहिक अंत्यसंस्कार झाले.
महिनाभरापुर्वीच वडीलांचे निधन
महिन्याभरापूर्वी तनिषाचे वडील प्रशांत तायडे यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने आई, मेघना आणि तनिषा हे तीनच सदस्य राहिले. मेघनाने घराची पूर्णत: जबाबदारी स्वीकारली. मेघना ही पुण्यात आयटी कंपनीत नोकरीवर आहे. त्यामुळे बारावीनंतर उच्च शिक्षणाकरिता तनिषालाही पुण्यात बोलावण्याचा निर्णय मेघनाने घेतला. तनिषाची फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीला अॅडमीशन घेतली. त्यामुळे तनिषा ही पुण्याला जाण्यासाठी निघाली आणि देवाघरी पोहोचली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.