Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

Thane News : महायुतीत ठाण्याच्या वर्चस्वावरुन मतभेद समोर आलेत... मुख्यमंत्रिपदावरुन गणेश नाईकांनी शिंदेंना डिवचलंय.. तर शिंदेंनीही सत्तेचं क्रेडिट वॉर छेडलंय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

Maharashtra : महापालिका निवडणुकीआधीच महायुतीत नवा रणसंग्राम सुरु झालाय... एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली... मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, म्हणत वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय... गणेश नाईकांनी शिंदेंना डिवचल्यानंतर ठाकरे सेनेच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. लॉटरी नाही तर शिंदेंना मटका लागल्याचा टोला ठाकरे सेनेने लगावलाय.. नाईकांनी शिंदेंना डिवचल्याने शिंदेंनी थेट महायुतीच्या विजयाचं क्रेडिट स्वतःकडे घेत नाईकांवर पलटवार केलाय...

ठाण्याच्या वर्चस्वासाठी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय वैर आहे. त्याची सुरुवात आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असल्यापासून आहे.. त्यामुळे शिंदेंची ठाण्यातच कोंडी करण्यासाठी गणेश नाईकांना बळ दिल्याची चर्चा रंगलीय.. तर नाईकांनीही शिंदेंना अस्वस्थ करण्यासाठी राजकीय डाव टाकलेत...

गणेश नाईकांनी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केलीये. एवढंच नाही तर ठाण्यात ओन्ली कमळ म्हणत शिंदेंना थेट आव्हान दिलंय...त्याबरोबरच शिंदेंचं नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याची टीका केली..

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये ठाण्याच्या वर्चस्वावरुन खटके उडत आहेत. महायुतीतच कुरघोडीचं राजकारण रंगल्यास आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याचीच शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT