Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं भाजपचं 'कमळ'

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. अकोल्यात जेष्ठ नेत्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • ठाकरे सेनेला अकोल्यात खिंडार

  • जेष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

  • जिल्ह्यात भाजपची वाढली शक्ती

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Political News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ च्या अखेरपर्यंत पार पडणार आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी इनकमिंग आणि आउटगोईंग असे चित्र दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नेत्याने ठाकरे सेनेची साथ सोडली आहे. आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील ठाकरे सेनेचे जेष्ठ नेते उमेश जाधव यांनी आज (१८ ऑक्टोबर) आपल्या अनेक सहकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्येे काही सरपंच आणि पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

आज (१८ ऑक्टोबर) भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुप धोत्रे यांच्या रामनगरमधील निवासस्थानी उमेश जाधव यांचा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशाला अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उमेश जाधव यांच्या प्रवेशामुळे बाळापूर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजपला मोठा फायदा झाल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT