Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटाला झटका! बडा नेता हाती घेणार 'भाजप'चं कमळ

Maharashtra Political News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौरांच्या नंतर ठाकरे गटातील आणखी एक नेता पक्षातून बाहेर पडणार आहे.

Saam Tv

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे.

  • युवासेना चिटणीस मिथुन व्यास सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • काही दिवसांपूर्वी माजी महापौर त्र्यंबक तुपे ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदेगटात गेले.

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी महापौरानंतर आणखी एका नेता ठाकरे गटातून बाहेर पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि युवासेनेचे चिटणीस मिथुन व्यास हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मिथुन व्यास त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. यामुळे ठाकरे गटाला गळती लागल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मिथुन व्यास यांनीही ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची छत्रपती संभाजीनगरमधील ताकद कमी होत असल्याचे म्हटले जात आहे.

उपशहर प्रमुख युवासेना चिटणीस मिथुन व्यास, उपशहर प्रमुख युवा सेना विष्णू क्षीरसागर, उपशहर प्रमुख युवासेना योगेश जोशी, उपशहर प्रमुख संजय महागुडे, उपशहर प्रमुख युवासेना शैलेश सुरडकर, विभाग प्रमुख गुलमंडी आकाश झुंजरकर, गटप्रमुख अशितोष खंडेलवाल, शाखाप्रमुख प्रभात पुरवार, शाखाप्रमुख पंकज जयस्वाल, गटप्रमुख अभिषेक डोंगरे यांच्यासह केतन सावजी, शुभम डेंगे, गुड्डू डोंगरे, अभिषेक क्षीरसागर, सचिन बंब, तुषार चोरडिया, रोहित अहुजा, निखिल, सचिन अचलिया, तुषार दरक, अंकित सोनी आणि परेश जैन यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Accident : गंगेत स्नान करून येताना काळाचा घाला, ६ जणांचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मराठा आरक्षणाचा फटका EWS प्रवर्गाला! प्रवेशात तब्बल १५ टक्क्यांची घट|VIDEO

Pune Tourism : पुण्यातील 'हे' जुळे किल्ले कधी पाहिलं आहात का? पर्यटकांचे प्रमुख आकर्षण

SCROLL FOR NEXT