Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

PM पदावरून पायउतार होण्याआधी मोदी आपले हट्ट पूर्ण करतायत, One Nation One Election वरून संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut Criticized PM Narendra Modi: वन नेशन, इलेक्शनच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रोखठोकच्या माध्यमातून पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Priya More

वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रस्तावाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुढच्या १०० दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वन नेशन वन इलेक्शनवरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

अशातच सामनाच्या रोखठोकमधून वन नेशन वन इलेक्शनवर निशाणासाधत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखठोक सवाल विचारले आहेत. वेताळ ज्याप्रमाणे आपला हट्ट पूर्ण करतो, त्याप्रमाणे पीएम मोदी यांनी एक देश, एक निवडणूक हा आपला हट्ट पूर्ण करण्याचे ठरवले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. याचसोबत त्यांनी रोखठोकच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कोसळलेल्या योजनांची यादी देखील दिली आहे.

रोखठोकमध्ये पीएम मोदींवर टीका करताना संजय राऊत यांनी असे लिहिले आहे की, 'वयाच्या ७५ व्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील. त्याआधी ते आपले सर्व हट्ट पुरवून घेत आहेत. ‘एक देश एक निवडणूक’ हा त्यातलाच एक हट्ट. त्या हट्टासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. मोदींनी जाहीर केलेल्या सर्व योजना कोसळून पडल्या आहेत. ‘वन इलेक्शन’ योजनाही कोसळून पडेल.' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

'एक वर्षाने पंतप्रधान मोदी यांनाही जावे लागेल आणि त्याआधी मोदी यांना ऐतिहासिक निर्णय घेऊन इतिहासात नाव कोरायचे आहे. मोदी यांनी वर्षभरानंतर काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण आपल्या नावावर इतिहास लिहिला जावा यासाठी त्यांनी सुरू केलेल्या खटपटी देशाला खड्ड्यात घालणाऱ्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षांत कोणतेच भरीव काम केले नाही. त्यांनी उत्सव आणि सोहळे साजरे केले. त्यांनी जगभ्रमण केले. मोदी यांनी सरकारी तिजोरी रिकामी केली. त्या बदल्यात देशाला काय मिळाले?', असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

पीएम मोदी आणि गृहमंत्री शहा यांना भविष्यात निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असे म्हत संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'एक देश, एकच उद्योगपती ही त्यांची मूळ योजना. ‘नेशन-इलेक्शन’ हे दुय्यम आहे. जे सरकार मणिपुरात पोहोचले नाही ते सरकार सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणार. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासारख्या राज्यांत सात-आठ टप्प्यांत निवडणुका घेणाऱ्या अकार्यक्षम आणि पक्षपाती निवडणूक आयोगाच्या भरवशावर देशात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याची योजना हा फार्स ठरेल. '

तसंच, 'चार राज्यांतील निवडणुका एकत्र घेऊ न शकणाऱ्या आणि मुंबईसह महाराष्ट्रातील १४ महानगरपालिकांच्या निवडणुका तीन वर्षे न घेणाऱ्यांना एक देश, एक निवडणुकीचा डंका वाजवायचा आहे. मोदी हे पुढच्या वर्षी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्त होतील. कारण ही योजना त्यांनीच आणली. त्यामुळे नवा पंतप्रधान एकत्र निवडणूक योजनेचा निर्णय घेईल, तोपर्यंत एकत्र निवडणुकांचे ढोल वाजवत रहा!'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT