Supriya Sule Saam Tv
महाराष्ट्र

Supriya Sule: राज्यात २०० आमदारांचं सरकार तरीही अस्वस्थता, सुप्रिया सुळेंनी सांगितलं त्यामागचं कारण

Supriya Sule News: संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics:

संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालत राहिलो तर राज्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी खरंच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. यामुळे मायबाप जनतेचे नुकसान होत आहे. २०० आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थीर नाही. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर निशाणा साधला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रितीसंगमावरील समाधीला अभिवादन करण्यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडत महाराष्ट्र अस्वस्थ असल्याचं म्हटलंय.

दिल्लीची अदृश्य शक्ती

महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थतता आहे. इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा वापर करून २०० आमदारांचं सरकार आलेलं आहे. महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचं पाप दिल्लीची अदृश्य शक्ती करत आहे. ही शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्याही राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होताना दिसत नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

देशात महाराष्ट्राचं महत्व कमी करायाचंय

पुढे राज्यातील गुंतवणूकांवर बोलताना त्या म्हणाल्या की, गुंतवणूका येतात आणि दुसऱ्या राज्यात जातात. हातात असलेले प्रोजेक्ट देखील दुसऱ्या राज्यात जातात. हे फक्त महाराष्ट्रातच का होतं? कारण केंद्रात एक अदृश्य शक्ती आहे. ज्याला देशात महाराष्ट्राचं महत्व कमी करायचंय. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र रचलं जात आहे.

दुष्काळ, पिण्याचं पाणी हे राज्यातील सर्वात मोठं आव्हान

गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग फार कमी झाला आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्रात सध्या प्रचंड अस्वस्थतता आहे. दुष्काळ, पिण्याचं पाणी हे राज्यातील सर्वात मोठं आव्हान आहे. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्येही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे या वर्षी महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

SCROLL FOR NEXT