भाजपाच्या घर चलो अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांनी केलेल्या भुजबळांच्या भाजपप्रवेशाच्या दाव्यावर खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीस किंवा भाजपडून छगन भुजबळांना कोणत्याही प्रकारची पक्षप्रवाशाची ऑफर देण्यात आलेली नाही. पक्षाचा प्रमुख म्हणून ईश्वर साक्ष सांगतो की, ते सत्ताधारी पक्षात असताना त्यांनी भाजपमध्ये का प्रवेश करावा हा एक मोठा प्रश्न आहे. भाजपडून भुजबळांशी अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा भुजबळांकडूनही असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये दररोज आरोप प्रत्यारोप होतायेत. मात्र भुजबळ सत्तेत असतानाही ग्रुहमंत्री त्यांना रोखत नाहीत. त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असेल म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांना अडवत नसावेत, असा आरोप अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी केला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आरक्षणाच्या संदर्भात जाती जातींमध्ये तेढ निर्माण होणे योग्य नसून मराठ्यांनी स्वतंत्र आरक्षण घेतल्यास त्यांना 16 ते 17 टक्के आरक्षणाचा फायदा मिळेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्यास मिळणारा फायदा किती राहील इतक्या 351 जातींमध्ये आरक्षणाची टक्केवारी किती येईल हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी मराठा समाजाच्या सर्वपक्षीय चाळीस-पन्नास नेत्यांनी एकत्र बसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी आणि मराठ्यांनी जास्तीत जास्त आरक्षण कसे मिळवून घेता येईल याचा विचार करावा, असा सल्लाही मराठा नेत्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.