Amol kolhe Meet Ajit Pawar: शरद पवार गटातून कोल्हे घेणार 'एग्झिट'? अजित पवारांची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा; जाणून घ्या

Amol kolhe : अजित पवार गटाने नवी खेळी करत शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली. अपात्रता करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दिले. यात खासदार अमोल कोल्हे यांचे नाव होते. यानंतर अमोल कोल्हे यांंनी अजित पवार यांची भेट घेतली.
Amol kolhe
Amol kolheNCP
Published On

Amol kolhe Meet Ajit Pawar:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. कोल्हेंनी अजित पवार यांची भेट का घेतली. शरद पवार गटातून अमोल कोल्हे बाहेर पडणार का असे प्रश्न केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर खुद्द खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहेत. (Latest News)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला जात आहे. याबाबतची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे केलीय. यानंतर अजित पवार गटाने नवी खेळी करत शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपात्रता करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दिले. यात खासदार अमोल कोल्हे यांचे नाव होते. यासह शरद पवार, सुप्रिया सुळे यांचेही नावे होती. मात्र याचिका दाखल करताना अजित पवार गटाने शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव याचिकेतून वगळले. अपात्रता पत्रातून सकाळी नाव वगळल्यानतंर दुपारी खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावर कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलंय.

अपात्रता पत्रातून नाव काढण्यात आल्याचं विचारणा पत्रकारांनी कोल्हेंना केली. हे आपल्याला माहिती नव्हतं. तसेच याबाबत उद्या सुनावणीवेळी समोर येईल असं ते म्हणाले. ही भेट फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत होती. कामाविषयी भेट घेतल त्यावेळी अजित पवार मतमतांतर चर्चेत आणत नसल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. दरम्यान मी शरद पवार यांच्या सोबतच आहे, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी दिलं.

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजित पवारांनी महत्त्वाची भूमिका सुरुवातीपासून घेतलीय. या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता ही भेट झाली असल्याचं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

तर पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प लवकर व्हावा ही मागणी होणं गरजेचं आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार असल्याचं खासदार कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.

Amol kolhe
NCP Conflict : अजित पवार गटाची नवी खेळी; शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करण्याची मागणी, वगळण्यात आलेली ती ३ नावे कोणती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com