आज शिवसेना आमदार अपात्रतेवर पुन्हा सुनावणी सुरूय. या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षकारांच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. या दोन्ही वकिलांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तंबी दिलीय. दोन्ही पक्षकार वकील युक्तीवाद करताना विनाकरण वाद करत आहे यामुळे वेळ वाया जातो. मला निश्चित वेळेत या प्रकरणाचा निकाल लावायचा आहे. परंतु तुमच्या वादामुळे सुनावणीला वेळ लागत आहे. मी हे रेकॉर्डवर घेईल आणि हे मला सुप्रीम कोर्टात सांगावे लागेल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना दिलीय.
आज सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभूची आज पुन्ही उलट तपासणी करण्यात आली. व्हीप बजावण्यावरून शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी सुनिल प्रभू यांना कोंडीत पकडलं आहे. व्हीप बजावण्यावरून जेठमलानी यांनी सुनिल प्रभू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. प्रभू यांनी आमदारांना बजावलेला व्हिप हा कसा खोटा आहे, याची बाजू जेठमलानी मांडत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यावर अक्षय कामत यांनी जेठमलानी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. यानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाली. या दोन्ही वकिलांच्या खडाजंगीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केलीय. या वादामुळे सुनावणीला उशीर होत असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं.
जेठमलानीच्या प्रश्नांना सुनिल प्रभूंनी काय दिलं उत्तर
सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या मूळ कागदपत्रांमध्ये नमूद केलेली तारीख नक्कलच्या सांक्षाकित प्रतीवर दिसत नाही.
प्रभू
दिसत नाही, हे खरे आहे,पण प्रिंटिंग मिस्टेक असू शकते.
जेठमलानी
मूळ प्रतीवरील तारीख झेरॉक्स वर का नाही?
प्रभू
प्रिंटिंग मिस्टेक असू शकते
जेठमलानी
सह पत्र पी २ च्या पहिल्या पानावर असलेले दिनांक कुणाच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.
प्रभू
कार्यालयीन कर्मचारी हे दिनांक टाकतात व पूर्ण कागद समोर आणतात
कुणाचे हस्ताक्षर आहे, हे मी कसे सांगू.
जेठमलानी
सह पत्र पी २ ही मूळ प्रतीची अचूक नक्कल आहे का?
प्रभू -
नक्कल आहे.
जेठमलानी
तुम्ही म्हटला की तुम्ही जे काही याचिकेत लिहिले आहे ते तुम्हाला मराठीत समजावून सांगितले आहे.
मग आता तुमच्या याचिकेत पान क्रमांक १५ वर पी २ ही मूळ कागदपत्रांची सांक्षाकित प्रत असल्याचे तुम्ही नमूद केले आहे,
हे खरे आहे का?
प्रभू -
आता एक ते दीड वर्ष झाले
कुठे लक्षात राहणार एवढं सगळं
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.