'माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल', तर...; डॉ. अमोल कोल्हे यांचा व्हिडिओ चर्चेत

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे - डॉ. अमोल कोल्हे
PM Narendra Modi News, Dr Amol Kolhe News
PM Narendra Modi News, Dr Amol Kolhe Newssaam tv
Published On

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा निषेध काही देशांमध्ये केला जात आहे. परिणामी, देशात विखारी वातावरण निर्माण केलं जात आहे. या संपूर्ण घडामोडींमुळं जागतिक पातळीवर नुकसान होऊ नये तसेच अर्थव्यवस्थाही भक्कम राहावी, यासाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol kolhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सोश मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करत म्हटलं आहे. कोल्हे यांनी ट्विटरवरही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे खासदार कोल्हे यांनी जाहीरपणे पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. (Amol Kolhe News)

PM Narendra Modi News, Dr Amol Kolhe News
मनसेचं एकमेव मत भाजपला मिळणार? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे ?

सातत्यानं निर्माण केलं जाणारं विखारी वातावरण आणि एकप्रकारची वाचाळता यामुळे जागतिक पातळीवर काय नुकसान होऊ शकतं, देशाची मान कशा पद्धतीनं खाली झुकली जाते, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात आपल्याला येतोय, हे घडत असताना माध्यमातून ज्या बातम्या समोर येत आहेत, ज्या पद्धीतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा निषेध हा काही देशांमध्ये केला जातोय, ते नक्कीच खेदजनक आहे. पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नसून ती एक इंन्स्टीट्यूशन आहे. या इन्स्टीट्यूशनचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगळाच पाहिजे. माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल, तर या देशाचा नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

अकारण गोष्टी तयार केल्या जात आहेत. त्यामुळे देशाच्या जागतिक पातळीवरच्या प्रतिमेवर आणि दुरगामी देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतं, याचं भान प्रत्येकानं ठेवणं हे तितकच गरजेच आहे. देशांतर्गत असलेले प्रश्न आपआपसातील सामंजस्याने नक्कीच सोडवता येतील आणि त्याचवेळी कोणत्याही प्रकारचं राजकारण करत असताना राष्ट्र प्रथम ही संकल्पना विसरून चालणार नाही. राजकारणामुळं राष्ट्रगीताला बाधा येईल, याचं सुद्धा भान प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे. माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल, तर या देशाचा नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com