Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: अनिल देशमुखांवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले, थेट फडणवीसांवर केले आरोप

Sanjay Raut On Anil Deshmukh Attack Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Priya More

Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी जीवघेणा हल्ला झाला. प्रचारसभा आटोपून घराच्या दिशेने जात असताना अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्लाप्रकरणावर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या हल्ला प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते अनेक वर्षे आमदार आणि मंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिले असेल त्यांच्या डोक्यावर दुखात झाली होती आणि ते रक्तबंबाळ झाले होते. हल्ला करताना भारतीय जनता पक्षाकडून घोषणा देत होते.

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'राज्याच्या माजी गृहमंत्र्यावर जीवघेणा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडवणीस असलेल्या नागपुरात या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे हे दिंडोरे आहेत. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहेत. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. सध्या भाजपच्या काळामध्ये गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असते आणि ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात.'

तसंच, 'देवेंद्र फडवणीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशाप्रकारे हल्ला झाला. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली. उद्या मतदान होणार आहे. मला चिंता वाटते की, आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातल्या कित्येक कार्यकर्त्यांना धमक्या आणि हल्ले होतील आणि खोटे गुन्हे देखील दाखल केले जातील. हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहे. मी आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आणि अनिल देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि मी देखील केली आहे.

संजय राऊत यांनी यावेळी पीएम मोदींवर देखील हल्लाबोल केला आहे. 'महाराष्ट्राला धक्का बसावा आणि चिंता वाटावी हे कालच प्रकरण आहे. भाजपवाले म्हणतात हे स्टंट आहे. नरेंद्र मोदींकडून स्टंट शिकलेलं नाही आहे का? नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही. हे स्टंटगिरी आहे बरं का ? प्रधानमंत्री आणि तुमचे नेते कायम करत असतात. आम्हाला गरज नाही. देशमुख यांचं डोकं किती फुटले आहे हे बघा. कशाप्रकारे हल्ला झाला आहे ते देखील पहा. कशाला स्टंटची गरज आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले का? विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाची कारवाई; नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमधून पावणे दोन कोटी रुपयांची रोकड हस्तगत

Maharashtra Election : मोदीजी, हे ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, तुम्ही स्वतः नालासोपाऱ्यात या!

Maharashtra Election : ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर काय असणार सुविधा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय-काय मिळालं?

SCROLL FOR NEXT