Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा; निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद

Maharashtra Politics : दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. राज्यात आजपासून आचारसंहिता जारी होईल.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Election Date Saam Digital
Published On

Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी निवडणुका होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी विधेनसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्याआधी राज्यातील विधानसभा होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आज निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र होणार आहे. निवडणूक आयोग आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.

युती-आघाडी अॅक्शनमोडमध्ये

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषध होणार आहे. त्याशिवाय निवडणुकीच्या तयारीसंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठकही होणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी नेमलेल्या निरीक्षकांसोबत ही बैठक होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची तयारीही पूर्ण झाली आहे.

२०१९ मध्ये कधी झाली होती निवडणूक? 2019 Maharashtra Legislative Assembly election

२१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. २०१९ मध्ये २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्यावेळी राज्यात ६१.४ टक्के मतदान झालं होतं. एकसंध शिवसेना आणि भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले होते. पण ठाकरेंकडून महाविकास आघाडीची चाहूल मिळाली, देवेंद्र फडणवीस यांनीही २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार उप मुख्यमंत्री झाले होते. पण बहुमत चाचणीआधीच हे सरकार कोसळलं. २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण दोन वर्षानंतर शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत सूरतवरुन गुवाहाटी गाठली. सरकार अल्प मतात आल्यामुळे ठाकरेंनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर निघत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार हे महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com