Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा', शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Controversial Speech by Gulabrao Patil: शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देताना वादग्रस्त विधान केले. 'तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा', असे ते म्हणाले.

Priya More

Summary -

  • जळगावमधील सभेत गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

  • “तुमची बायको हेमा मालिनी आहे असे समजा” या विधानामुळे खळबळ

  • एकनाथ खडसे यांच्यावरही गुलाबराव पाटील यांनी टीका केली

  • वरणगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये भरसभेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलबराव पाटील यांनी केलेल्या विधानामुळे वादग्रस्त विधान केले. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देताना त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठू शकते. 'जसा हेमामालिनीला मतदानाचा अधिकार आहे. तसंच तुमच्या पत्नीलाही आहे. त्यामुळे तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा.', असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मंत्री गुलाबराव पाटील भाषण यांनी सांगितले की, 'राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. तोच अधिकार हेमा मालिनीला सुद्धा एक मत देण्याचा दिला आहे. तसंच तुमच्या बायकोलाही आहे. त्यामुळे तुमची बायको हेमा मालिनी असल्याचे समजा.'

गुलाबराव पाटील यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीत लढाई कोणाची झाली. खडसे माझ्यावर टीका करायचे गुलाबराव पाटील असा आहे आणि तसा आहे अरे बाबा मी निवडून आलो रे भो. मी असा तसा नाही आहे. तुम्ही आम्हाला त्रास दिला. खडसे यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं. आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला. जिल्ह्यात तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला हे भोगाव लागते. माजी मंत्रीसोबत बॅग पकडायला कोणी राहत नाही.'

दरम्यान, भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटांमध्ये पक्ष प्रवेश केला. वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी हे पराभूत झाले होते ,त्यांना शिंदे गटाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदी घेण्यात आले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे वरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांसह आज राजेंद्र चौधरी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेमध्ये शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khajur Chutney Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी टेस्टी खजूरची चटणी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: पालघर _ डहाणू दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या तरुणाला चिरडले

Cabinet Expansion : नितीश कुमारांच्या मुलासह ३२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, टीम 'सम्राट'मध्ये कोण कोण?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ४.५० लाख रुपये

SCROLL FOR NEXT