Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झटका बसला आहे. शिंदेसेनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी रणजित सिंह पाटील यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • कोल्हापुरात शिंदेसेनेला मोठा झटका

  • शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • गोकुळच्या माजी अध्यक्षांनीही केला पक्षप्रवेश

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये इनकमिंग आणि आउंट गोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळते. निवडणुका होण्यापूर्वी कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी झाली आहे. शिंदेसेनेतील बडा नेता पक्षातून बाहेर पडला आहे.

कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष, मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज (९ ऑक्टोबर) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

रणजित सिंह पाटील हे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांचे बंधू आहेत. राजेखान जमादार हे रणजित सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. प्रवीण सिंह पाटील यांनी हसन मुश्रीफ गटातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रणजिंत सिंह आणि राजेखान जमादार यांनी कोल्हापुरात मुश्रीफ गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला.

मुंबईमध्ये आज (९ ऑक्टोबर) राजेखान जमादार आणि रणजित सिंह पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. दोन्ही नेत्यांसह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT