eknath shinde. x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटातील अंतर्गत वाद वाढला, पक्षातील बडा नेता नाराज; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण

Maharashtra Political News : नाशिकमधील शिंदेसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज असल्याचे समोर आले आहे. ते शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

Yash Shirke

मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. माजी खासदार हेमंत गोडसे नाराज असल्याचे म्हटले जात होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्याने आपला पराबव झाला अशी हेमंत गोडसे यांची भावना आहे. गोडसे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे पक्षामध्ये नाराज असल्याचा चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर गोडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. पण पक्ष अंतर्गत गटबाजीमुळे मी नाराज आहे. भाजपामध्ये शिस्त, डिसिप्लेन आहे; तो आपल्या पक्षात नाही. शिवनेसेत पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गटबाजी होत आहे', असे गोडसे यांनी म्हटले आहे.

'मी पक्षाच्या नेतृत्त्ववर नाराज नाही. मात्र स्थानिक पातळीवर पक्षात अजिबात शिस्त नाहीये. याबाबत अनेकदा मी तक्रार केली आहे. मी केलेल्या तक्रारीवर योग्य ती दखल घेतली जाईल अशी माझी आशा आहे. जिल्ह्यातील मंत्री जर पक्ष संघटनेमध्ये लक्ष घालत असतील, तर अशा प्रकारच्या अडचणी येणार नाही', असे वक्तव्य हेमंत गोडसे यांनी केले.

माजी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, 'प्रत्येक जिल्ह्यात छोटे प्रॉब्लेम देखील जर एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेले, तर त्यांच्या कामाचे लोड वाढेल. पक्षामध्ये शिस्त असेल, डिसीप्लेन असेल; तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी देखील फायदा होईल. आता मी सध्या शिवसेनेत आहे, कुठेही जाण्याचा माझा विचार नाही. आज मी श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

अरे बापरे! रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीची मगर; पाहताक्षणी नागरिकांचा अडकला श्वास

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

SCROLL FOR NEXT