Maharashtra Politics: 'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; मविआमध्ये नवा वाद?
Maharashtra Politics Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; मविआमध्ये नवा वाद?

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. २९ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेलाही मविआ एकत्रित लढणार असल्याचे चित्र दिसत असतानाच ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्ट्रीकर यांनी काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांची तक्रार केल्याने मविआमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळू नये, अशी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. यासंबंधी त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे पत्रही पाठवले आहे.

प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता विरोधात काम केले. त्या मविआच्या कोणत्याही प्रचार सभेत सहभागी झाल्या नाहीत. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांना मदत केल्याचे आरोप नागेश पाटील यांनी केले आहेत. यासंबंधी त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल राव यांना पत्रही पाठवले आहे.

त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील पक्षविरोधी काम केले आहे. त्यामुळे त्यांना देखील विधानसभेचे तिकीट मिळणार नाही असे खासदार नागेश पाटील म्हणाले. ज्या दिवशी वानखेडे तिकीट मागतील तेव्हा आपण त्यांची तक्रार पक्षाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आष्टीकर यांच्या या तक्रारीमुळे मविआमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Come Home: भारतात येण्यासाठी टीम इंडियाचं विमान निघालं! किती वाजता पोहोचणार? कसं असेल नियोजन? VIDEO

Raju Shetti on Milk Price News : दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, राजू शेट्टी आंदोलनावर ठाम

Bhandara News: हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; भंडारा जिल्ह्यात हळहळ

Sai Tamhankar : सई ताम्हणकरला फिल्मसाठी काँप्रोमाईज करण्याची मागणी, सईनं सांगितला तिच्यासोबत घडलेला 'तो' विचीत्र प्रसंग

Pune News: तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी महामार्गावर रास्तारोको, उरुळी कांचनमध्ये ग्रामस्थ आक्रमक; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT