Mauli Abba Katke Will Join NCP Ajit Pawar Group Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिरुर हवेलीत ठाकरे गटाचे टेन्शन वाढलं, उद्धव ठाकरेंचा शिलेदार अजित पवारांच्या गळाला

रोहिदास गाडगे

Maharashtra Politics News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांमध्ये इन कमिंग- आऊट गोइंग सुरू आहे. राज्यातील अनेक मोठ्या पक्षांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. बडे नेते पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता शिरूर हवेलीमध्ये ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. उद्धव ठाकरेंचा शिलेदार अजित पवारांच्या गळाला लागला आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार असल्याने अशोक पवारांविरोधात महायुतीकडून माऊली आबा कटके शिरुरच्या मैदानात उतरवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ हा सर्वात महत्वाचा मानला जातो. या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंचा शिलेदार जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके अजित पवारांच्या गळाला लागले आहेत. लवकरच माऊली कटके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. माऊल कटके यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे शिरुर हवेलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.

उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके अजित पवारांचे घड्याळ हाती घेऊन शिरुरच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होताच शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील राजकिय गणित बदलाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले असल्याचे म्हटले जात आहे.

आमदार अशोक पवारांच्या पुढे आव्हान उभं करण्यासाठी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटकेंना मैदानात उतरवले जाणार असून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आमदार अशोक पवारांना आव्हान देण्यासाठी शिरुर हवेली मतदारसंघात आखणीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे माऊली आबा कटके यांचा जाहिरपणे पक्ष प्रवेशही लवकर होणार असल्याची चर्चाही सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Solution: पुण्याची वाहतूक कोंडी कशी सुटणार? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्लान सांगितला

Rohit Pawar News : लाडकी बहीण योजना बंद नव्हे सुरूच ठेवणार; आमदार रोहित पवार यांच्याकडून योजनेचे कौतुक

Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले नोएल टाटा नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: "महाराष्ट्राला नानाभाऊच मुख्यमंत्री हवेत! लवकरच नानापर्व!"पुण्यात झळकले पटोले यांचे फ्लेक्स

Viral News : वाढीव बिलामुळे नगरसेविका संतापली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात धडकली, अधिकाऱ्यांवर भडकली, VIDEO

SCROLL FOR NEXT