Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा हादरा, राज्यातील बडा नेता भाजपच्या वाटेवर

Maharashtra Political News : माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे. आता आणखी एक नेता पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Yash Shirke

  • राज्यामध्ये मागील काही दिवसात शरद पवार गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

  • माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • आता आणखी एक नेता शरद पवार गटातून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान महाविकास आघाडीला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात शिवसेना ठाकरे गटाच्या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील बडा नेता हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई पाहायला मिळाली. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेखर निकम यांना तिकीट दिले होते. तर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत यादव यांना उमेदवारीची संधी मिळाली होती. या संघर्षामध्ये प्रशांत यादव यांचा पराभव झाला. हेच प्रशांत यादव शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी प्रशांत यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत यादव हे शिंदेगटात जाणार असल्याचे म्हटले जात होते. पण ऐनवेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पुढील काही दिवसात प्रशांत यादव यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आज (७ जुलै) राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सकाळी अकराच्या सुमारास हा सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला होता. कोकणातून प्रशांत यादव हेसुद्धा पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षाला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT