Sharad Pawar On Chhagan Bhujbal saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar On Chhagan Bhujbal: राज्यात अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधीच शरद पवारांनी मोठे गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यात अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधीच शरद पवारांनी मोठे गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी होती. मात्र भुजबळांना मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादीत फूट पडली असती असा दावा पवारांनी केलाय. यावर भुजबळांनीही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटांवरचा हा रिपोर्ट.

राज्यातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पुन्हा 2004 निवडणुकीतल्या राजकीय कढीला ऊत आलाय. 2004 साली जास्त जागा जिंकूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही यावर गेल्या 20 वर्षांत अनेकदा चर्चा रंगल्या आणि प्रश्नही उपस्थित झाले. मात्र पवारांनी याचं गूढ पहिल्यांदाच उघड करत मोठा गौप्यस्फोट केला. 2004 साली मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडे योग्य नेता नव्हता असा दावा केला. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यावेऴी सर्वात ज्येष्ठ असलेल्या भुजबळांबाबतही मोठा गोप्यस्फोट केला.

भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला. काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती असं सांगत पवारांसोबत गेल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. अजित पवारांनीही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वेळोवेळी 2004च्या मुख्यमंत्रिपदावरून पवारांना टार्गेट केलंय. काँग्रेसचीही मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी होती असा दावाही अजित पवार करत असतात. पक्षस्थापनेपासून पवारांना एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही अशी टीका वारंवार होत असते.

2004 मध्ये पवारांनी ही संधी का सोडली याचा खुलासा तर केलाय. मात्र भुजबळांना संधी म्हणजे पक्षफुटीची नांदी होती असं सांगून पवारांनी नाशिकच्या मतदानापूर्वीचं टायमिंग साधून काही वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय का? अशी चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूर परिस्थिती कायम, सर्व शाळा-अंगणवाडीला आज सुट्टी

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

SCROLL FOR NEXT