Sharad Pawar faces a major political jolt as three loyal NCP district chiefs from Buldhana, Hingoli, and Ahmednagar resign ahead of local elections. Saam TV marathi News
महाराष्ट्र

Sharad Pawar Setback : शरद पवारांना जबरी धक्का, ३ निष्ठावंताचा 'जय महाराष्ट्र', जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याचं कारण काय?

Sharad Pawar NCP crisis in Maharashtra : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसलाय. बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला असून, या तिघेही पवारांचे निष्ठावंत मानले जात होते.

Namdeo Kumbhar

Why NCP leaders quit Sharad Pawar faction : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जिल्ह्यात तीन मोठे धक्के बसले आहेत. बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही हे नेते शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. पण आता निवडणुकीच्या तोंडावर कौटुंबिक कारण देत नेत्यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्ष रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या निष्ठावंतानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तीन महत्त्वाच्या नेत्याने निवडणुकीत साथ सोडल्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. (Sharad Pawar’s NCP Faces Major Setback as Buldhana, Hingoli, and Ahmednagar Chiefs Resign)

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यात मोठा झटका

बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खाद्यांवर घेतली होती.. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे.... खेडेकरांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारा कळविले असले तरी देखील निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे.. ते आता काय निर्णय घेतात याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली राष्ट्रवादीला खिंडार -

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हिंगोलीत मोठे खिंडार पडले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी मोठा दणका दिला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या सह अनेक नगरसेवकांनी आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान दिलीप चव्हाण हे आपल्या सोबतच आहेत असं मला वाटत होतं असं वक्तव्य पक्षप्रवेशाच्या वेळी अजित पवारांनी केलं आणि त्यामुळे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकच हशा पिकला.

अहिल्यानगरमध्ये फाळकेंनी साथ सोडली -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा राजीनामा. तब्बल ७ वर्षे पद सांभाळल्यानंतर, पक्ष फुटीच्या वेळी पवार यांच्या सोबत राहिल्यानंतर आता कौटुंबिक करण सांगत तडकाफडकी राजीनामा दिला. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली आहे. त्यासाठी पक्षाची तयारी सुरू आहे. वरच्या पातळीवर बदल झाले आहेत. प्रदेशाध्यपदी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे आले आहेत. फाळके यांचे पाटील यांच्याशीही चांगले संबंध होते. निवडणुकीच्या तयारीसाठी सध्या प्रदेश पातळीवर बैठका सुरू आहेत. दुसरीकडे पक्षांतरेही वेगाने सुरू झालेली आहेत. अशात फाळके यांनी पक्ष सोडला आहे. त्यांची पुढील भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT