Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवार गटाला मोठा हादरा! बडा नेता अजित पवारांकडे जाण्याच्या तयारीत

Maharashtra Political News : आज (२ ऑगस्ट) उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवीण ठाकूर यांनी प्रवेश केला. ठाकूर यांच्यानंतर आणखी एक नेता अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Yash Shirke

  • शरद पवार गटातील बडा नेता साथ सोडणार?

  • अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार?

  • चर्चांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Maharashtra : काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये नाराज असल्याने प्रवीण ठाकूर पक्षातून बाहेर पडले. दोन मोठे नेते लागोपाठ साथ सोडून गेल्याने काँग्रेसला राज्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.

अलिबाग येथे प्रवीण ठाकूर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवीण ठाकूर यांचा पक्षप्रवेश झाला. ठाकूर यांच्यानंतर महाविकास आघाडीमधील आणखी एक नेता अजित पवाराच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

भूम, परंडा, वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये आहेत. ते शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरुद्ध राहुल मोटे विधानसभेची निवडणूक लढवली होती. आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यांच्या क्षेत्रात यासंबंधित कार्यकत्यांसह बैठकी झाल्याचे म्हटले जात आहे. जर राहुल मोटे अजित पवार यांच्यासोबत जाणार असतील, तर तो राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ हरिश्चंद्री गावाजवळ वाहतूक कोंडी

Vande Bharat: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू, थांबा- तिकीट अन् वेळापत्रक काय? वाचा सर्वकाही

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा मोठा निर्णय, नर्हे ते देहू रोडपर्यंत पुणे-बेंगळुरू एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Rinku Rajguru: जेव्हा मी लग्न करेन...; कृष्णराज महाडिक यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोवर रिंकू राजगुरुने केला मोठा खुलासा

Atharva Sudame: प्रसिद्ध युट्यूबर अथर्व सुदामेची संपत्ती किती? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

SCROLL FOR NEXT