Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : काँग्रेसला रायगड जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Ajit pawar ncp
Ajit pawar ncpx
Published On
Summary
  • राज्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

  • काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी पक्षातंर केले आहे.

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ठाकूर यांनी प्रवेश केला आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात काँग्रेसला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत आहेत. काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. आता कोकणात काँग्रेसमधून एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

आज रायगडमध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अलिबाग येथे प्रवीण ठाकूर यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते, महत्ताचे पदाधिकारी हजर होते.

Ajit pawar ncp
Maharashtra Politics : शिवसेनेला मोठं खिंडार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

प्रवीण ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीसपद होते. पक्षाच्या चिटणीसपदी असलेल्या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधी कैलास गोरंट्याल, आता प्रवीण ठाकूर असे नेते पक्षांतर करत असल्याने काँग्रेसला धक्यांवर धक्के बसले आहेत.

Ajit pawar ncp
Prajwal Revanna : ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, माजी खासदाराला जन्मठेप; काय आहे प्रकरण?

काँग्रेसमध्ये प्रवीण ठाकूर नाराज होते. माझ्या वडिलांवर, मधुकर ठाकूर यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेस पक्षाकडून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले आहे अशी माहिती प्रवीण ठाकूर यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

Ajit pawar ncp
Yavat Pune : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com