Yavat Pune : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांना अटक

Yavat Pune News : यवतमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २२ आरोपींनी अटक केली आहे. या आरोपींना पोलिसांनी आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Yavat Pune News
Yavat Pune News saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील यवत हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट

  • पुणे पोलिसांनी २२ जणांना केली अटक

  • उरलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके रवाना

मंगेश कचरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी (१ जुलै) सकाळी एका तरुणाने केलेल्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे संतापाची लाट उसळली. काही तासांनंतर यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला. तणाव वाढल्यानंतर दोन गट आमनेसाने आले, परिसरात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. तणावाच्या स्थितीमुळे पोलीस अलर्ट मोडवर आले. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

यवत हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. एकूण वेगवेगळ्या पाच एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. २२ जणांना मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. मेडिकल झाल्यानंतर त्यांना दौंड कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलिसांची सहा पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे. एकूण ५० पेक्षा जास्त जणांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Yavat Pune News
Prajwal Revanna : ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, माजी खासदाराला जन्मठेप; काय आहे प्रकरण?

दौंडमधील यवतमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणामधील आरोपींना आरोग्य तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. आरोपींची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाईल. कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये या आरोपींंना यवत पोलीस ठाण्यातून आरोग्य तपासणीसाठी पोलीस घेऊन गेले आहेत. उरलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे.

Yavat Pune News
Maharashtra Politics : शिवसेनेला मोठं खिंडार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

२६ जुलै रोजी यवतमध्ये नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असताना अवघ्या काही दिवसांनी यवतमध्ये दुसरा वादग्रस्त प्रकार घडला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने राडा झाला. ही पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक झाली. काही काळासाठी परिसरात प्रचंड गोंधळ होता. पोलिसांनी वेळेवर कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला.

Yavat Pune News
Solapur Crime : जेवत नाही, शाळेत जात नाही म्हणून राग; सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com