भोर, वेल्हा, मुळशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष इंदापूरकडे वळवले आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांत प्रवीण माने यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.
भाजपने शरद पवार यांना मोठा धक्का दिला. हर्षवर्धन पाटील यांच्या बदल्यात भाजपने शरद पवार यांच्या जवळचा माणूस पडला. प्रवीण माने यांचे कुटुंबीय पवारांचे जवळचे मानले जाते. मात्र विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवली होती. एकेकाळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय असणारे माने कुटुंबीय सोनाई दूध व्यवसायाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात आणि इंदापूरमध्ये सामाजिक काम करत आहे.
इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या मातीवर, माणसांवर, जनतेवर वेगळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रेम आहे. राज्यात आणि देशपातळीवर भाजप मजबूत होत असल्याने पुणे जिल्ह्यातील राजकीय समजल्या जाणार्या इंदापूर तालुक्यात देखील भाजप स्ट्राँग करण्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याने सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांचे चिरंजीव आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत.
भाजपला आगामी येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये इंदापूर तालुक्यात भाजप आपले वेगळे स्थान निर्माण करू शकते. इंदापूरमध्ये प्रवीण माने भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोंडीत पकडणार आहेत. प्रवीण माने यांच्या प्रवेशामुळे इंदापूरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.