Sanjay Raut On Akshay Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'ठाणे, नागपूरमध्ये अत्याचाराच्या घटना, किती लोकांचे एन्काऊंटर केले? संजय राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र

Sanjay Raut On Akshay Shinde Encounter Case: एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात असंख्य मी आकडे देऊ शकतो. त्यांपैकी किती जणांचे एन्काउंटर झाले?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Gangappa Pujari

Sanjay Raut On Devendra Fadnavis: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत एन्कांऊंटर करण्यात आला. या एन्काऊंटरनंतर आता महायुतीमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरु झाली आहे. अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर मुंबईमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हातात बंदूक घेतलेले बॅनर्स झळकवण्यात आले होते, तसेच देवाचा न्याय असा उल्लेखही करण्यात आला होता. या बॅनरबाजीवरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"देवेंद्र फडणवीस हे स्वतः ला सिंघम समजतात. एक चित्रपट आला होता सिंघम, ती काल्पनिक कथा असते, पडद्यावरील. आता या महाराष्ट्रात एन्काऊंटरचे श्रेय घेण्यासाठी, सिंघम कोण? यासाठी चढाओढ सुरु आहे. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत मी सिंघम, एकनाथ शिंदे यांच्या हातात देखील बंदूक आहे ते देखील बोलत आहेत मी सिंघम. या महाराष्ट्रात अडीच वर्षात असंख्य बलात्कार आणि महिलांवर अत्याचार झाले. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात असंख्य मी आकडे देऊ शकतो. त्यांपैकी किती जणांचे एन्काऊंटर झाले?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

"कालच नालासोपारा मध्ये भारतीय जनता पक्षातील एका पदाधिकाऱ्याला सामुदायिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. आता त्यांचा एन्काउंटर करणार आहात का? तुम्ही सिंघम आहात ना? सिंघम स्वतः जाऊन गोळ्या घालतो. आता त्याला कधी गोळ्या घालणार? तुम्हाला कोणालातरी वाचवायचं आहे. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेतला पुरावा नष्ट केला. या बलात्कार कांडातील सूत्र पॉर्न फिल्म बनवत असल्याचा आरोप आहे, त्या शाळेतील एक व्यक्ती आरएसएस संबंधित होता. आधी तुमच्यात सिंघम कोण हे ठरवा?" असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाला पूर्णविराम येईल ते देखील आता बनणार नाहीत. त्यांचे सरकार जाणार आहे, ते आमदारही नसतील. त्या पद्धतीने राजकारण सुरु आहे, त्यावरुन जनता त्यांना धडा शिकवेल, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT