Maharashtra Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढणार, अपक्ष आमदार आज कमळ हाती घेणार

MLA Prakash Awade Will Join BJP Today: कोल्हापुरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Maharashtra Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढणार, अपक्ष आमदार आज कमळ हाती घेणार
MLA Prakash Awade Will Join BJP TodaySaam Tv
Published On

रणजित माजगावकर, कोल्हापूर

Maharashtra Political Upates in Marathi: कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रकाश आवाडे यांच्यासह चिरंजीव राहुल आवाडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसला रामराम करून अपक्ष निवडून आलेल्या आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. २०१९ साली भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पराभव करून प्रकाश आवाडे विजयी झाले होते. आवडे कुटुंबियांच्या भाजप प्रवेशामुळे सुरेश हळवणकर यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजीमधील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मंगळवारी त्यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज दुपारी कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवारे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Maharashtra Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढणार, अपक्ष आमदार आज कमळ हाती घेणार
Maharashta Election 2024: सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल

मंगळवारी रात्री उशिरा प्रकाश आवडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबतच्या हालचालीने वेग घेतला. काँग्रेसचे निष्ठावंत घराणे म्हणून आवडे यांची ओळख होती. मात्र गेल्या ५ वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसची साथ सोडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते विजयी देखील झाले.

या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी विधानसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. गेली ५ वर्ष ते भाजप प्रवेशासाठी उत्सुक होते. अखेर आज प्रकाश आवाडे यांचा अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Maharashtra Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढणार, अपक्ष आमदार आज कमळ हाती घेणार
Eknath Shinde : CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; समर्थक आमदारांनाही सोबत नेणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com