मयुर राणे, मुंबई|ता. २१ डिसेंबर २०२३
संसदेतील घुसखोरीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. घुसखोरी प्रकरणावरुन प्रश्न विचारल्याने आत्तापर्यंत तब्बल १४२ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून भाजपने देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केल्याची टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"आपले शत्रू काश्मिरमध्ये जवानांवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. सरकारला त्याची माहितीच नाही. ही गंभीर बाब आहे. इकडे संसदेत लोक घुसतात, हल्ला करतात त्याचीही माहिती नाही. सुरक्षेबाबत प्रश्न विचारले तर आम्हाला देशाच्या बाहेर काढतील असे म्हणत तुम्ही जवानांवरुन पुन्हा राजकारण करणार आहात का?" असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी उपस्थित केला.
पुन्हा पुलवामा घडवण्याचा कट?
"काल पूंछ भागात हल्ला झाला, याची सरकारला खबर नाही. हा पुलवामाचा (Pulwama Attack) कट आहे. तुम्ही पुन्हा पुलवामा सारख्या विषयांवर मते मागणार आहात का? राजकारणासाठी इतके क्रूर झालाय का? असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका केली. दोन महिन्यातील जवानांच्या मृत्यूचे आकडे पाहा? सरकार काय करत आहे?" असे राऊत यावेळी म्हणाले.
. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राम मंदिर उद्घाटनावरुन टीकास्त्र..
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनावरुनही मोदी सरकारवर टीका केली. " राम मंदिर उद्घटानाला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण नाही. यांनी बाळासाहेबांनाही बोलावलं नसतं. राम मंदिर ही काही कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. पण ज्यांनी योगदान दिलं त्यांनाच उद्घाटनाला बोलावणार नाहीत.." असा घणाघात राऊतांनी केला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.